Introduction
SHIVAJI ESTATES LIVE STOCK AND FARMS PRIVATE LIMITED and its subsidiary, SELF GOAT FARMING respect your privacy. This Privacy Policy explains how we collect, use, and protect your personal information.
Shivaji Estate Livestock and Farms Pvt. Ltd.
We are excited to announce the upcoming launch of our platform, which will facilitate the settlement of investor claims. please download the below PDF and fill in the required details for your consent please mail it to [email protected] or WhatsApp at 7249822203.
शिवाजी इस्टेट लाईव्हस्टॉक्स अँड फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड – गुंतवणूकदारांसाठी महत्वाची माहिती
शिवाजी इस्टेट लाईव्हस्टॉक्स अँड फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 1995 मध्ये स्थापन करण्यात आली. कंपनीचा व्यवसाय शेळी पालन व त्यासंबंधित इतर व्यवसायांवर आधारित होता. आर्थिक व्यवस्थापनाच्या उद्देशाने, कंपनीने लोकांकडून ठराविक मुदतीसाठी ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) स्वीकारण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये कंपनीला चांगले यश मिळाले.
सरकारच्या नियम व धोरणांमध्ये बदल झाल्यामुळे, कंपनीला आपला व्यवसाय थांबवावा लागला. 2003 मध्ये काही गुंतवणूकदारांच्या तक्रारींमुळे महाराष्ट्र सरकारने कंपनीवर एम.पी.आय.डी. कायद्याद्वारे बंदी आणली व कंपनीची सगळी मालमत्ता जप्त करून कंपनी बंद करण्यात आली. 2004 पासून न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली, परंतु 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे ही प्रक्रिया काही काळ थांबवण्यात आली.
नोव्हेंबर 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एम.पी.आय.डी. कायद्याअंतर्गत कारवाई पुन्हा सुरू झाली आणि कोर्टात स्थगित असलेली कंपनीवरील केस पुन्हा सुरू झाली. 2015 मध्ये कंपनीने कोर्टात प्ली-बार्गेनिंग (आपसी तडजोड) चे आवेदन सादर केले. कंपनीने न्यायालयाला विनंती केली की, इतके वर्षे झाल्यानंतरही या केसबद्दल कुठलाही निकाल निघालेला नाही, त्यामुळे गुंतवणूकदारांना होणारा त्रास कायम आहे.
कंपनीने Competent Authority ( सक्षम अधिकारी) आणि Investigation Officer ( तपास अधिकारी) यांच्या उपस्थित गुंतवणूकदारांची मीटिंग घेऊन सल्लामसलत केली आणि न्यायालयाला प्रस्ताव सादर केला. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतवले आहेत, त्यांना त्यांनी केलेली गुंतवणूक आणि त्यावर 15% नुकसान भरपाई देण्यात येईल. .
2024 मध्ये, न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाली. न्यायालयाने असे मत मांडले की, कंपनीच्या सर्व गुंतवणूकदारांना जर ही योजना / प्रस्ताव मान्य असेल, तर कंपनी सर्वांना पैसे परत करू शकते.
ज्या गुंतवणूकदारांपर्यंत कंपनीला पोहोचता आले नाही, त्यांच्या साठी कंपनीने 24 मे 2024 ला महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे.
मी, कंपनीचा डायरेक्टर, कंपनीच्या वतीने सर्व गुंतवणूकदारांना विनंती करतो की, आपण सर्वांनी कंपनीने दिलेला प्रस्ताव मान्य करून लवकरात लवकर आपले कन्सेंट फॉर्म सही करून त्याचा फोटो जाहिरातीत दिलेल्या व्हाट्सअप नंबरवर पाठवावा किंवा जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर कुरिअर करावा, जेणेकरून कंपनीला सर्व गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर परत करता येतील.
कन्सेंट फॉर्म कंपनीच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घेता येईल.
धन्यवाद,
डायरेक्टर,
शिवाजी इस्टेट लाईव्हस्टॉक्स अँड फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड
Download from the below tab: